आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर, अशा नऊ विभागात ही परीक्षा घेतली जाणार आहे.

Updated: Feb 28, 2017, 08:43 AM IST
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर, अशा नऊ विभागात ही परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेला 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थी बसणार आहेत. यापैकी 8 लाख 48 हजार 939 विद्यार्थी, तर 6 लाख 75 हजार 436 विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्यभरातल्या 2 हजार 710 परीक्षा केंद्रामध्ये ही परिक्षा होणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी, शिक्षण मंडळाची भरारी पथकं सज्ज झाली आहेत.