मुंबई : मेमरी कार्डशिवाय मोबाईल वापरण अशक्य आहे. टॅबलेट, स्मार्टफोन, डिजी़टल कॅमेरा ही गॅजेट्स वापरण्यासाठी मेमरी कार्ड किंवा एसडी कार्ड आपल्याला घ्यावीच लागतात. तुमच्या कडे असलेलं एसडी कार्ड म्हणजेच सिक्युअर डिजीटल कार्ड असली आहे का नकली, त्या कार्डमध्ये सांगितलेली स्टोरेज कॅपेसिटी तेवढीच आहे का नाही, याची माहिती मिळणं आता सोपं होणार आहे.
ही माहिती मिळवण्यासाठी एसडी इनसाईट हे ऍप गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. या ऍपच्या माध्यमातून तुमच्या कार्डबाबतची माहिती तुम्हाला काही वेळातच मिळु शकते. हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर कार्डची कंपनी, कार्डचं स्टोरेज आणि कार्ड कधी बनवण्यात आलं, याची माहिती मिळेल. त्यावरुनच तुम्हाला आपली फसवणूक झाली का नाही हे कळेल.
तुमचं कार्ड खराब असेल तर या ऍपवर एसडी कार्ड इज इनव्हॅलिड असा मेसेज येतो. असा मेसेज आला तर मेमरी कार्ड फॉर्मेट करुन पुन्हा प्रयत्न करु शकता. पण या कार्डबाबत ऍपला काहीच माहिती नसेल, तर ओरिजिन इज अननोन असा मेसेज येईल.
बहुतेक वेळा तुम्ही मेमरी कार्ड विकत घेता तेव्हा, ते पॅकिंगमध्ये असतं. पण तरीही तुमची नकली कार्ड विकून फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे कार्ड खरेदी करण्याआधी या ऍपच्या माध्यमातून कार्ड असली आहे का नकली हे पाहायला विसरु नका.