पारले गर्लच्या फोटोमागचं सत्य... कोण आहे ही मुलगी ?

पारले बिस्कीट पुड्यावरची मुलगी आता कशी दिसते 

Updated: Aug 7, 2016, 02:56 PM IST
पारले गर्लच्या फोटोमागचं सत्य... कोण आहे ही मुलगी ? title=

मुंबई : अनेक वर्षांपासून ज्या पारले जी बिस्कीटने अनेकांच्या मनावर राज केलं त्या पारले बिस्कीट पुड्यावरची मुलगी आता कशी दिसते हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. 

पारले जी बिस्कीटावर असलेली मुलगी आता आजी झाल्या आहेत. नीरु देशपांडे असं यांचं नाव आहे. नीरु देशपांडे या नागपूरच्या राहणाऱ्या आहेत. जेव्हा त्यांचा फोटो पारलेच्या पुड्यावर वापरला गेला तेव्हा त्या ४ वर्ष ३ महिन्याच्या होत्या. याबाबतची पोस्ट अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. पण याबाबत अजून कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही जणांचं म्हणणं आहे की या सुधा मुर्ती यांचा फोटो आहे.

पारले जी कंपनीने देखील ही माहिती खोटं असल्याचं म्हटलं आहे. पारलेच्या प्रोडक्ट मॅनेजरने म्हटलं आहे की, कंपनीने एक काल्पनिक फोटो बनवून तो वापरला आहे. सोशल मीडियावर फिरणारी पोस्ट ही खोटं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.