नवी दिल्ली : तुमच्या फेसबुक अकाऊंटमुळे खुद्द 'फेसबुक'ला कशी आणि किती कमाई होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल, तर हे वाचाच...
एका अकाऊंटमुळे फेसबुकला जवळपास 13 डॉलरची कमाई होते... ही गोष्ट सोशल नेटवर्किंग साईटसला जाहिरातींमुळे होणाऱ्या मिळकतीच्या विश्लेषणातून समोर आलीय.
eMarketer या शोध कंपनीनं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, जवळपास दीड अरब यूझर्स असणाऱ्या 'फेसबुक'ला जागतिक स्तरावर जाहिरातींद्वारे प्रत्येक अकाऊंटमुळे 12.76 डॉलरची कमाई होते.
eMarketerनं फेसबुकसोबतच इतर सोशल नेटवर्किंग साईटसला जाहिरातींमुळे झालेल्या कमाईची आकडेवारी जाहीर केलीय. यामध्ये, फेसबुकच्या कमाईचा हिस्सा जवळपास 65 टक्के असल्याचं म्हटलं गेलंय.
फेसबुकला यावर्षी जाहिरातींमुळे जवळपास 16.3 अरब डॉलरचा फायदा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. हा नफा 2014 साली फेसबुकला मिळालेल्या 11.5 अरब डॉलरपेक्षा जवळपास 41 टक्के अधिक आहे.
मिळकतीबाबत फेसबुकनंतर नंबर लागतो तो ट्विटरचा... ट्विटरला जगभरातील यूझर्समुळे 7.75 डॉलर्स तर अमेरिकेच्या प्रत्येक यूझर्समुळे 24.48 डॉलरची कमाई मिळत असल्याचं यात म्हटलंय. ट्विटरची यूझर्स संख्या जवळपास 31.6 करोड आहे. ट्विटरला 2015 यावर्षात जवळपास दोन अरब डॉलर कमाई जाहिरातींद्वारे होत असल्याचा अंदाजा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.