मुंबई: जगप्रसिद्ध अशा हार्ले डेव्हिडसननं भारतीय बाजारामध्ये एक नवीन बाईक लाँच केली आहे. 1200 कस्टम असं या बाईकचं नाव आहे. हार्ले डेव्हिडसनच्या या नव्या बाईकला भारतामध्येच असेंबल करण्यात आलं आहे.
1200 कस्टमचे फिचर्स
हार्ले डेव्हिडसनच्या या नव्या बाईकमध्ये 1200 सीसीचं फ्युअल इंजेक्टेड इंजिन आहे. तसंच या बाईकमध्ये 5-स्पीड ट्रान्समिशन आहे. या बाईकची फ्युअल टँक क्षमता 17 लिटरची आहे.
भारतामध्ये हार्ले डेविडसन बाईकची 13 मॉडेल्स विकत आहे. ज्यातली 7 मॉडेल्स भारतात एसेंबल केली जात होती. आता याची संख्या आठ झाली आहे. हार्ले डेव्हिडसनच्या 1200 कस्टम या बाईकची एक्स शोरुममधली किंमत 8.90 लाख रुपये एवढी आहे.