आता नेटवर्क नसतानाही करू शकता चॅट

आपल्यातले बहुतांश लोक हे नेटवर्क प्रॉब्लम झेलत आहेत. कधी कधी तर ऐन कामाच्या वेळेसच नेटवर्क गायब होऊन जातं. पण आता तुम्ही नेटवर्क नसलं तरीही चॅट करू शकता, एवढंच नाही तर ऑफ लाइन मॅपवर लोकेशन ही शेयर करू शकतात आणि हे शक्य झालय गोटेना (GoTenna) मुळे.गोटेना हे 5.8 लांबी,1 रूंदी, 0.5 इंच जाडी असलेलं 57 ग्रॅमचं एक डिवाइस आहे.

Updated: Jul 18, 2014, 07:26 PM IST
आता नेटवर्क नसतानाही करू शकता चॅट title=

मुंबई : आपल्यातले बहुतांश लोक हे नेटवर्क प्रॉब्लम झेलत आहेत. कधी कधी तर ऐन कामाच्या वेळेसच नेटवर्क गायब होऊन जातं. पण आता तुम्ही नेटवर्क नसलं तरीही चॅट करू शकता, एवढंच नाही तर ऑफ लाइन मॅपवर लोकेशन ही शेयर करू शकतात आणि हे शक्य झालय गोटेना (GoTenna) मुळे.गोटेना हे 5.8 लांबी,1 रूंदी, 0.5 इंच जाडी असलेलं 57 ग्रॅमचं एक डिवाइस आहे.

गोटेना ब्लूटूथ लो-एनर्जीने स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो. हा तुमच्या स्मार्टफोनशी 20 फूट अंतरापर्यंत कनेक्ट होऊ शकतो.गोटेना तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट झाल्यानंतर गोटेनाच्या फ्री-अॅपवर तुम्ही मॅसेज पाठवू शकतात. जो गोटेनावर जाईल नंतर तो मॅसेज लॉन्ग-रेंज वेव्स मार्फत तुम्हांला ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे त्या व्यक्तीच्या स्मार्टफोनपर्यंत जाईल.

कंपनीनुसार हे सगऴं काही मिली सेकंड्स मध्ये होतं. गोटेनाची रेंज 50 मैल (80 किमी) आहे. या रेंजमध्ये एक गोटेना यूज़र दूसरया गोटेना यूज़रशी कम्यूनिकेट करू शकतो.

गोटेना हे टिकाऊ धातु, नाइलॉन आणि सिलिकन पासून बनलं आहे. हा वॉटर-रेजिस्टेंट आणि डस्ट-टाइट आहे. यामध्ये सर्किट बोर्ड, 

रेडियो चिप्स, कस्टम एंटिना आणि माइक्रो-यूएसबी केबलने चार्ज होणारी लिथियम-आयन बैटरी आहे. 

हा डिवाइस जोडीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2 यूनिट (एक जोडी) ची कींमत 299.99 डॉलर आहे. पण प्री-ऑर्डर वर 50% सूट 

वर हा डिवाइस तुम्हाला 149.99 डॉलर म्हणजेच 9000 रू. ला मिळेल. याची शिपिंग 2 ते 3 महिन्यात सुरू होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.