गूगलची बलून इंटरनेट सेवा भारतातही!

भारतीय आकाशात आता लवकरच गूगलचा बलून उडताना दिसू शकेल. 'वॉल स्ट्रीट जर्नल'नं दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोनर्नियाची इंटरनेट कंपनी 'गूगल' सध्या जगभरातील दूरसंचार कंपन्यांशी 'बलून'च्या साहाय्यानं इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासंबंधी चर्चा करत आहे. यामध्ये, भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.

Updated: Feb 17, 2015, 06:00 PM IST
गूगलची बलून इंटरनेट सेवा भारतातही! title=

न्यूयॉर्क : भारतीय आकाशात आता लवकरच गूगलचा बलून उडताना दिसू शकेल. 'वॉल स्ट्रीट जर्नल'नं दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोनर्नियाची इंटरनेट कंपनी 'गूगल' सध्या जगभरातील दूरसंचार कंपन्यांशी 'बलून'च्या साहाय्यानं इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासंबंधी चर्चा करत आहे. यामध्ये, भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.

गूगलचे हे बलून वाय-फायरहीत अलतील यामुळे दूरच्या क्षेत्रांवरही इंटरनेट सेवा उपलब्ध करून देता येणं शक्य होईल. या योजनेवर गूगलची सहाय्यक कंपनी गूगल एक्स 'लून' काम करत आहगे. या योजनेत गूगल आकाशात अनेक बलून (फुगे) सोडणार आहे, हे सर्व बलून्स एका राऊटरप्रमाणे काम करतील. 

गूगलच्या म्हणण्यानुसार, आज जवळपास 4.5 अरब लोकांपर्यंत इंटरनेट सेवा पोहचलेली नाही. अशा ग्राहकांसाठी ही उत्तम सोय असेल. ही सेवा 2016 पर्यंत सुरू होऊ शकते. भारतात अजूनही केवळ 25 टक्के जनतेपर्यंतच इंटरनेट सेवा पोहचू शकलीय. 

केवळ भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही सेवा पोहचवायची असेल तरी दोन लाखांहून जास्त टॉवर उभारावे लागतली. मात्र, गूगलची ही सेवा टॉवरच्या मॉडेलपेक्षा नक्कीच स्वस्तात उपलब्ध होऊ शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.