मुंबई : गूगल जीमेल बंद करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न पडण्याचं कारणंही तसंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार गूगल 'इनबॉक्स बाय जीमेल' सर्व्हिसमधून युझर्सना नोटीफाय करतंय की, गूगलने इनबॉक्स या नावाने जीमेल सारखी सेवा सुरू केली आहे, आता जीमेल युझर्स त्यांना इनबॉक्स या सेवेवर रिप्लेस करायचे आहेत.
फॉर्ब्सनुसार इनबॉक्स युझर्सने लॉगिन केल्यानंतर हा मेसेज येतो, इनबॉक्स वापरण्यासाठी धन्यवाद, याला अधिक सोप करण्यासाठी आम्ही जीमेलला येथे रिटायरेक्ट केलं आहे, असा संदेश येतो.
रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, यूझरना जीमेल रिप्लेस इनबॉक्स या सेवेशी रिप्लेस करायचं नसेल, तर टर्न ऑफही करता येतं. गूगलने ऑक्टोबर २०१४ साली इनबॉक्स नावाची सेवा सुरू केली होती. इनबॉक्सच्या माध्यमातून युझर्सना अपॉईन्टमेन्ट, फ्लाईट बुकिंग आणि पॅकेज डिलेवरीची माहिती देणे आहे, पण या माहितीपेक्षा कामाशी संबंधित असलेले ईमेल युझर्सना अधिक महत्वाचे आहेत.
मात्र मोठ्या प्रमाणातील युझर्सना आजही इनबॉक्सची सेवा पचत नाही, कारण जीमेलमध्ये अधिक सुटसुटीत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जीमेलमध्ये प्रायमरी सेक्शनमध्ये महत्वाचे ईमेल एका नजरेत वाचता येतात.
सोशलमध्ये फेसबुक, ट्वीटर, यू-ट्यूबसारख्या सोशल साईटचे अपडेट एका क्लिकवर दिसतात, तर प्रोमोशनमध्ये इतर कंपन्याच्या जाहिराती, ऑफर वाचता येतात, अपडेटमध्येही अशाच प्रकारचे अपडेट घेता येतात, तेव्हा जीमेल ही तशी लोकांच्या अंगवळणी पडलेली सेवा असली, तरी इनबॉक्स ही जीमेल एवढी प्रभावी नसल्याचं जास्तच जास्त नेटीझन्सचं मत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.