Wefi Pro अॅपने घ्या फ्री वायफायची मजा

आता तुम्हाला मोबाईलच्या डेटा बिलचे टेन्शन घेण्याची गरज नाही. हल्ली यूजर्स जितक्या कमी प्रमाणात डेटा यूज कसा होईल यासाठी क्लृप्त्या शोधत असतात. आता तुम्हाला मोबाईल डेटासाठी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही Wefi Pro या अॅपच्या मदतीने फ्री वायफायचा आनंद घेऊ शकता.

Updated: Nov 28, 2015, 11:52 AM IST
Wefi Pro अॅपने घ्या फ्री वायफायची मजा title=

नवी दिल्ली : आता तुम्हाला मोबाईलच्या डेटा बिलचे टेन्शन घेण्याची गरज नाही. हल्ली यूजर्स जितक्या कमी प्रमाणात डेटा यूज कसा होईल यासाठी क्लृप्त्या शोधत असतात. आता तुम्हाला मोबाईल डेटासाठी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही Wefi Pro या अॅपच्या मदतीने फ्री वायफायचा आनंद घेऊ शकता.

या अॅपचा वापर करताना आता तुम्हाला कोणत्याही वायफाय सर्चिंगची गरज पडणार नाही. हे अॅप स्वत: वायफाय सर्च करुन तुमच्या डिवाईसला कनेक्ट करेल. ज्या भागामध्ये वायफाय आहे ते सर्च करुन तुमच्या डिवाईसला कनेक्ट केले जाईल. 

जर आणखी कोणतेही वायफाय तेथे आहे तर ज्याचा स्पीड अधिक आहे त्या वायफायशी हे अॅप आपल्या डिवाईसला कनेक्ट करेल. दरम्यान, या अॅपद्वारे तुम्ही केवळ पब्लिक वायफाय वापरु शकता. हे अॅप प्रायव्हेट वायफायला कनेक्ट होणार नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.