स्मार्टफोन ऑफर : तर २७ हजाराचा हा स्मार्टफोन मिळणार फ्री

दिवाळी, न्यू ईयर सारख्या उत्सावांच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या ऑफर देवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. स्मार्टफोन कंपनी आसुसने देखील एक मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला २७ हजारांचा मोबाईल फ्री मिळणार आहे.

Updated: Oct 20, 2016, 09:19 PM IST
स्मार्टफोन ऑफर : तर २७ हजाराचा हा स्मार्टफोन मिळणार फ्री title=

मुंबई : दिवाळी, न्यू ईयर सारख्या उत्सावांच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या ऑफर देवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. स्मार्टफोन कंपनी आसुसने देखील एक मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला २७ हजारांचा मोबाईल फ्री मिळणार आहे.
 
ही ऑफर आसुसच्या मॉडेल Zenfone 3 ZE520KL आणि ZE552KL मॉडेलवर देण्यात येणार आहे.

काय आहे ऑफर

ग्राहकांनी जर १८ ते २२ ऑक्टोबरमध्ये यापैकी कोणताही फोन घेतला तर ही ऑफर मिळणार आहे.
यापैकी 100 लकी ग्राहकांना वाऊचर देऊन पैसे परत केले जाणार आहे.
-मोबाईल हा अधिकृत दुकानातूनच घ्यावा लागेल. याची माहिती मायक्रोसाइटवर रजिस्टर करावी लागणार आहे.

स्मार्टफोनचे फीचर्स

- किंमत 27,999 रुपये
- डिस्प्ले 5.5 inch Full HD
- प्रोसेसर Qualcomm Snapdragon 652 chipset
- रॅम 4GB/64GB
- कॅमेरा 16/8MP
- बॅटरी 3000 mah

Asus Zenfone 3 ZE520KL

- किंमत 21,000 रुपये
- डिस्प्ले 5.2 inch
- प्रोसेसर Qualcomm Snapdragon 652 chipset
- रॅम 3GB/32GB
- कॅमेरा 16/8MP
- बॅटरी 2650 mah