फ्रीडम स्मार्टफोनची वेबसाईट क्रॅश

जगातील सर्वात स्वस्त असलेल्या फ्रीडम २५१ या स्मार्टफोनची आजपासून बुकिंग सुरु झालीये. मात्र बुकिंगच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना चांगला झटका बसला. 

Updated: Feb 18, 2016, 08:27 AM IST
फ्रीडम स्मार्टफोनची वेबसाईट क्रॅश title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त असलेल्या फ्रीडम २५१ या स्मार्टफोनची आजपासून बुकिंग सुरु झालीये. मात्र बुकिंगच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना चांगला झटका बसला. 

कंपनीने http://www.freedom251.com/ या वेबसाईटवरुन आज सकाळी सहा वाजल्यापासून बुकिंग सुरु होणार होती. मात्र जशी बुकिंगची वेळ आली तशी वेबसाईट क्रॅश झाली. इतकंच नव्हे तर फ्रीडम २५१ ट्विटरवरही ट्रेड करु लागला. 

या स्मार्टफोनसाठीची बुकिंग कालावधी २१ फेब्रुवारी रात्री आठ वाजेपर्यंत देण्यात आलाय. इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन मिळत असल्याने बुकिंगच्या वेळेस एकाचवेळी मोठ्या संख्येने ग्राहकांनी वेबसाईटला लॉग इन केले. 

रिंगिग बेल्स या कंपनीचा हा स्मार्टफोन आहे. २५१ रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये १.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आलाय. तसेच एक जीबी रॅम आणि आठ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आलीये. यात ३.२ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा तर ०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.