मुंबई : सुरक्षेच्या नावाखाली देशातील काही प्रमुख बँका एटीएमचे मोफत ट्रानझाक्शन काही शहरांमध्ये कमी करण्याच्या तयारी आहे. तुम्ही मोठ्या शहारत राहत असाल आणि तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर तुम्हांला प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे.
समजा, तुमच्याकडे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड आहे तुम्ही बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढले तर तुम्हांला प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये द्यावे लागतील आता ही रक्कम पाच व्यवहारानंतर वसूल करण्यात येते.
सध्या तुम्हांला दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यानुसार गेल्या बुधवारी मुंबईत बँकर्स आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत व्यवहारांची सीमा निश्चित करण्यासंदर्भात चर्चा झाली.
मोठ्या शहरात सर्वात प्रथम लागू करणार
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार यावर सहमत झाले की, देशभरात मोफत ट्रान्झाक्शनवर बंद करता येणार नाही. त्यामुळे मेट्रो शहरात सर्व ठिकाणी बँकांच्या एटीएमची संख्या अधिक असल्यामुळे त्यात पाच मोफत ट्रान्झाक्शन संपूर्णपणे बंद करण्यात यावे.
त्यामुळे मेट्रो शहरात ग्राहकाने दुसऱ्या एटीएममधून पैसे काढल्यास त्या प्रत्येकवेळी ट्रान्झाक्शन शुल्क द्यावे लागेल. यावेळी बैठकीत सहभागी झालेल्या एका बँकरनुसार या संदर्भात बँकांना एटीएम मॅपिंगचा रोडमॅप तयार करावा लागणार आहे. त्यामुळे कोणत्या भागात कोणते एटीएम सेंटर आहे.
शुल्क लवकरच निश्चित होणार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक व्यवहाराला किती फी द्यावी लागेल यावर सहमत झाले नाही. यावर निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे. देशात यावेळी १.५ एटीएम सेंटर आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०१३मध्ये बंगळुरूमध्ये एका महिलेवर एटीएममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.