ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'!

नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनं मोठमोठे डिस्काऊंट सेल ऑफर्स सुरु केल्यात. यामध्ये, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचाही समावेश आहे. पण, हा डिस्काऊंट सेल म्हणजे ग्राहकांसाठी खरंच पर्वणी आहे का? याचा खरंच ग्राहकांना फायदा होतोय का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Updated: Oct 13, 2015, 05:45 PM IST
ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'! title=

मुंबई : नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनं मोठमोठे डिस्काऊंट सेल ऑफर्स सुरु केल्यात. यामध्ये, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचाही समावेश आहे. पण, हा डिस्काऊंट सेल म्हणजे ग्राहकांसाठी खरंच पर्वणी आहे का? याचा खरंच ग्राहकांना फायदा होतोय का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

कारण, हे ई-कॉमर्स वेबसाईटचे डिस्काऊंट म्हणजे केवळ दिखावा आहे. डिस्काऊंट देऊन वेबसाईटवर दिसणाऱ्या किंमत धादांत खोट्या असल्याचं उघड झालंय. 

अमेझॉनचा फेक डिस्काऊंट
याचंच उदाहरण म्हणजे, अमेझॉनच्या 'बिग सेल'मध्ये YU यूफोरियाची किंमत डिस्काऊंटसहीत 6,499 रुपये दाखवण्यात आलीय. या फोनची खरी किंमत 7,999 रुपये असल्याचा दावा या शॉपिंग वेबसाईटनं केलाय. या शॉपिंग वेबसाईटवर ग्राहकांना 19 % डिस्काऊंट मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय. 

परंतु, YU च्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहिलं असता याची MRP किंमत 6,499 असल्याचं तुमच्याही लक्षात येईल. 

फ्लिपकार्टचा फेक डिस्काऊंट
दुसरीकडे, फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी टॅब 4 T231 13,999 रुपयांना उपलब्ध आहे. 17,350 रुपयांचा हा टॅब ग्राहकांना 26% डिस्काऊंटसहीत उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावाही यात करण्यात आलाय. परंतु, सॅमसंगच्या ऑफिशिअल ऑनलाईन स्टोअरवर या फोनची MRP किंमत 12,900 रुपये आहे. 

म्हणजेच, इथं ग्राहकांना कोणताही डिस्काऊंट तर मिळत नाहीच परंतु, उलट ग्राहक ज्यादा पैसे मोजत आहेत, हे यातून स्पष्ट दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.