द बिग बिलियन डेज: फ्लिपकार्टनं 10 तासांमध्ये विकले 5 लाख फोन

ई-वाणिज्य क्षेत्रातील प्रमुख कंपनी फ्लिपकार्टनं सांगितलं, त्यांनी सध्याच्या सेल (द बिग बिलियन डेज)मध्ये आज अवघ्या 10 तासांमध्ये पाच लाख मोबाईल हँडसेटची विक्री केलीय. फ्लिपकार्टनं सांगितलं की, हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे.. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही मंचावर आतापर्यंत 10 तास इतक्या कमी वेळात भारतात 5 लाख मोबाईलची विक्री झालीय.

Updated: Oct 15, 2015, 05:09 PM IST
द बिग बिलियन डेज: फ्लिपकार्टनं 10 तासांमध्ये विकले 5 लाख फोन title=

नवी दिल्ली: ई-वाणिज्य क्षेत्रातील प्रमुख कंपनी फ्लिपकार्टनं सांगितलं, त्यांनी सध्याच्या सेल (द बिग बिलियन डेज)मध्ये आज अवघ्या 10 तासांमध्ये पाच लाख मोबाईल हँडसेटची विक्री केलीय. फ्लिपकार्टनं सांगितलं की, हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे.. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही मंचावर आतापर्यंत 10 तास इतक्या कमी वेळात भारतात 5 लाख मोबाईलची विक्री झालीय.

कंपनीचा सेल 13 ते 17 ऑक्टोबरपर्यंत आहे. तर आज मोबाईल फोनचा सेल आहे काल मध्यरात्रीपासून हा सेल सुरू झाला. फ्लिपकार्टनं सांगितलं की, विक्रीच्या बाबतीत बंगळुरू, दिल्ली आणि मुंबई सारखे महानगर पुढे आहेत. तर अपेक्षेपेक्षाही छोट्या शहरांमधून चांगला प्रतिसाद मिळालाय.

आणखी वाचा - बिग बिलियन डेज: १० तासांत १० लाख वस्तूंची विक्री, फ्लिपकार्टचा दावा

नागपूर, इंदूर, कोइंबतूर, विशाखापट्टणम आणि जयपूरनं नेतृत्व केलंय. बंगळुरूच्या कंपनीनं सांगितलं 4जी असलेल्या मोबाईलची जास्त विक्री झाली.

कंपनीनं सांगितलं, 'या 10 तासांमध्ये जे फोन विकले गेले त्यात 75 टक्के 4जी सेवा देणारे मोबाईल होते.' फ्लिपकार्टचे वाणिज्य मंचाचे प्रमुख मुकेश बंसल यांनी सांगितलं की, 'मोबाईल विभागातील विक्री सर्वाधिक झालीय. पाच लाख फोन्सची विक्रीचा एक रेकॉर्डच झालाय. हा रेकॉर्ड म्हणजे भारतात स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीचं प्रमाण आहे.' फ्लिपकार्टनं सेलच्या पहिल्याच दिवशी 10 तासांमध्ये 10 लाखांच्या उत्पादनांची विक्री केली होती. 

आणखी वाचा - ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.