NEW YEAR पार्टीत हँगओव्हरपासून वाचण्यासाठी ५ टिप्स

३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण जगात नव्या वर्षाचे स्वागत केले जाणार आहेत. या दिवशी तरूण, वयस्क, लहान मुले आणि महिला पार्टी करण्यात दंग असतात. 

Updated: Dec 28, 2015, 05:02 PM IST
NEW YEAR पार्टीत हँगओव्हरपासून वाचण्यासाठी ५ टिप्स  title=

मुंबई : ३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण जगात नव्या वर्षाचे स्वागत केले जाणार आहेत. या दिवशी तरूण, वयस्क, लहान मुले आणि महिला पार्टी करण्यात दंग असतात. 

नव्या वर्षात कोणी किती नाही म्हटलं तरी तरूण वर्ग ड्रिंक्स घेणे पसंद करतात. ड्रिंक्स घेतल्यावर आपल्या हँगओव्हर होईल असे कोणालाही वाटत नसते. न्यू इअर पार्टीत हँगओव्हर पासून वाचण्यासाठी या खास टीप्स लक्षात ठेवल्या पाहिजे. 

१) पार्टीत जाण्यापूर्वी २ ते ३ ग्लास गरम पाणी पिऊन जा. यामुळे तुम्ही डिहाड्रेशनपासून वाचतात. असे केल्यास तुम्ही हँगओव्हरपासून वाचू शकतात. 

२) पार्टीत तुम्ही लाइट ड्रिंक घ्या. बीअर किंवा वाईन घेऊ शकतात. पार्टीत ब्रँडी घेण्यापासून वाचा. 

३) कॉकटेल बनवून पिणे टाळा. अनेकवेळा पार्टीत लोक दोन ड्रिंक्स मिक्स करून पितात. असे कोणी केले तर त्याला हँगओव्हरपासून कोणी वाचू शकत नाही. वाईन प्यायल्यानंतर रम पिऊ नका. 

४) तुमच्या ड्रिंक्समध्ये ज्यूस किंवा सोडा मिक्स करू शकतात. 

५) रिकामे पोट असताना डिंक्स करू नका. डिंक्स घेताना हळू हळू खाल्ले पाहिजे.