४जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लॉन्च

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये सुरू असलेल्या CES २०१५मध्ये आसुसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केलाय. आसुसनं काल जेनफोन सीरिजचा दुसरा ४जीबीवाला दमदार स्मार्टफोन जेनफोन २ लॉन्च केलाय.

Updated: Jan 8, 2015, 12:04 PM IST
४जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लॉन्च title=

मुंबई: अमेरिकेच्या लास वेगासमध्ये सुरू असलेल्या CES २०१५मध्ये आसुसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केलाय. आसुसनं काल जेनफोन सीरिजचा दुसरा ४जीबीवाला दमदार स्मार्टफोन जेनफोन २ लॉन्च केलाय.

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिकक्स शोमध्ये आसुसनं जेनफोननंतर स्मार्टफोन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी हा नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. जेनफोन २ स्मार्टफोन मार्चमध्ये बाजारात विक्रीला उपलब्ध होईल. कंपनीनं ४जीबी रॅमवाल्या मॉडेलच्या किमतीबाबत अजून खुलासा केला नाहीय.

आसुस जेनफोनचे खास फीचर्स

- आसुस जेनफोन २ जगातील पहिला ४जीबी रॅमवाला स्मार्टफोन आहे. एका वॅरिएंटमध्ये दोन जीबी LPDDR3 रॅम तर दुसऱ्या मध्ये चार जीबी LPDDR3 रॅम आहे.
- या फोनमध्ये २.३GHz वर चालणारा ६४ बीट इंटेल अॅटम Z3580 क्वाड कोर प्रोसेसर आहे.
- जेनफोन-२च्या दोन्ही वॅरिएंट १६जीबी, ३२जीबी आणि ६४जीबी इंटरनल मेमरी मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ६४जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्ड पण लावलं जावू शकतं.
- या फोनमध्ये ३०००mAhची बॅटरी दिली गेलीय.
- या स्मार्टफोनमध्ये ड्युएल कलर रियल टोन फ्लॅश, ऑटोफोकस लेंससोबतच १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा दिला गेलाय. तर ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
- हा फोन ड्यूअल मायक्रो-सिमला सपोर्ट करतो.
- याच्या २जीबी रॅमवाल्या मॉडेलची किंमत जवळपास १२,६०० रुपये आहे. 
- कनेक्टिव्हिटी बद्दल म्हटलं तर ४G LTE सोबत ३जी, GPRS/EDGE, GPS/A-Gps, ब्लू टूथ, ग्लॉनेस, वाय-फाय, USB OTG आणि NFC सारखे फीचर्स उपलब्ध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.