सावधान ! विराटने अनुष्काला लाथ मारण्याचा फोटो व्हायरल

क्रिकेटर विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माला लाथ मारण्याचा फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल होत आहे, हा फोटो बनावट आहे, विराट कोहलीने असा लाथ मारण्याचा कोणताही फोटो काढलेला नाही.

Updated: Feb 9, 2016, 06:53 PM IST
 सावधान ! विराटने अनुष्काला लाथ मारण्याचा फोटो व्हायरल title=

मुंबई : क्रिकेटर विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माला लाथ मारण्याचा फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल होत आहे, हा फोटो बनावट आहे, विराट कोहलीने असा लाथ मारण्याचा कोणताही फोटो काढलेला नाही.

व्हॉटस अॅपवर दररोज अशा अनेक गोष्टी पसरत असतात, ज्याची शहानिशा करणे गरजेचे असते, व्हॉटस अॅपवरील प्रत्येक बनावट, चुकीची गोष्ट पुढे फॉवर्ड करण्याची गरज नसते, हे यावरून शिकण्यासारखं आहे.

विराटने अनुष्काला लाथ मारण्याचा हा फोटो बनावट आहे, हे सर्व काही फोटोशॉपच्या मदतीने कम्प्युटरवर करण्यात आलं आहे. 

विराट कोहलीने फ्लाईंग मशीन कंपनीसाठी एक जाहिरात केली होती, तो फोटो आणि अनुष्काचा व्होगच्या कव्हरपेजसाठी काळ्या कपड्यात असलेला फोटो, खुबीने वापरून हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. तेव्हा या फोटोकडे दुर्लक्ष केलेलं बरं.