सावधान, अन्यथा तुम्ही 'फेसबुक' फिशिंगचे बळी ठराल

तुम्हालाही फेसबुकचं व्यसन लागलेलं असेल तर सावधान... एका अभ्यासानुसार, जास्त वेळेपर्यंत फेसबुकवर सक्रिय राहणारे लोक ‘सोशल मीडिया फिशिंग’ला बळी पडतात. 

Updated: Sep 17, 2014, 03:14 PM IST
सावधान, अन्यथा तुम्ही 'फेसबुक' फिशिंगचे बळी ठराल title=

नवी दिल्ली : तुम्हालाही फेसबुकचं व्यसन लागलेलं असेल तर सावधान... एका अभ्यासानुसार, जास्त वेळेपर्यंत फेसबुकवर सक्रिय राहणारे लोक ‘सोशल मीडिया फिशिंग’ला बळी पडतात. 

सोशल मीडिया फिशिंगचे गुन्हे ‘सायबर क्राईम’ अंतर्गत दाखल होतात. यामध्ये चुकीची माहिती देऊन लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं जातं. एका भारतीयानं केलेल्या या अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय. त्यामुळे, यापुढे ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारण्याअगोदर व्यक्तीची पडताळणी जरुर करून घ्या. 

फ्रेंड रिक्वेस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखतो की नाही? किंवा किती ओळखतो? म्युच्युअल फ्रेंडस् किती आहेत? याकडे बहुतेकदा युजर्स लक्ष देत नाहीत, असं या अभ्यासात समोर आलंय.

युझर्स जेवढ्या वेगानं आणि जितका अधिक फेसबुकचा वापर करतात तितकीच बेपर्वाई त्यांच्यात वाढत जाते. आपल्याशी कोण कोण जोडलं जातंय, याचा विचारदेखील त्यांना येत नाही. त्यामुळेच अशा युजर्ससाठी धोका वाढतो. 

या अभ्यासाचे प्रमुख डॉ. अरुण विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियातून ‘फिशिंग’शिवाय, वेगवेगळ्या गोष्टींची कॉपी करणं आणि लोकांची हेरगिरी करण्यासारखे गुन्ह्यांचाही समावेश आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.