मुंबई: सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक १ जानेवारी २०१५पासून आपले नियम आणि पॉलिसींमध्ये बदल करणार आहे. फेसबुकचं म्हणणं आहे की, यूजर्सना फेसबुकचा वापर करण्यासाठी काही टिप्स दिल्या जातील आणि त्यांना गाईडही केलं जाणार आहे.
प्रायव्हसी बेसिक्स:
या अंतर्गत यूजर्सला सांगितलं जाईल की ते कशाप्रकारे फेसबुकवरील आपल्या माहितीवर नियंत्रण ठेवू शकतात. उदाहरणार्थ आपणाला अनटॅगिंग, अनफ्रेंडिंग आणि ब्लॉगिंक संबंधी माहिती मिळेल. एवढंच नव्हे तर आपल्या प्रत्येक पोस्टकरीता ऑडियन्स निश्चित करता येईल. ही माहिती ३६ भाषांमध्ये उपलब्ध असेल.
आपल्या आजुबाजूला काय होतंय?
फेसबुक आपल्याला अशी माहिती देईल जी आपल्यासाठी उपयुक्त असेल. ही माहिती आपल्या लोकेशनच्या आधारे असेल. उदाहरणच द्यायचं झालं तर जर आपण फेसबुकवर आपली लोकेशन शेअर केली तर ते आपल्या अकाऊंटमध्ये त्या ठिकाणी असलेलं रेस्टॉरेंटचे मेन्यू, सिनेमा हॉल, लायब्रेरी इत्यादींची माहिती देतील.
खरेदी करणं होईल सोपी
फेसबुकवर BUY बटनचं टेस्टिंग सुरू आहे. ज्याच्या मदतीनं यूजर्स फेसबुक लॉगआऊट न करता खरेदीही करू शकेल. यासोबतच फेसबुक मनी ट्रांजेक्शनला अधिक सोपं करण्याचं कामही सुरू आहे.
प्रायव्हसीची माहिती जलदगतीनं मिळेल
फेसबुक प्रायव्हसीला अधिक एक्ससेबल बनवत आहे.
फेसबुकच्या कुटुंबाबद्दल माहिती जाणून घ्या
मागील अनेक वर्षांमध्ये फेसबुकचा विस्तार खूप जलद गतीनं झालाय. फेसबुक आपल्या यूजर्सला आपली कंपनी, अॅप्स आणि सर्व्हिसेसबद्दल माहिती देऊ इच्छितात. उदा. जर आपण इंस्टाग्रामचा पासवर्ड विसरले तर आपण फेसबुक अकाऊंटच्या माहितीच्या मदतीनं पासवर्ड रिकव्हर करू शकाल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.