कॅलिफोर्निया : फेसबुकच्या हेडक्वार्टरमध्ये इंटर्नशिप करणाऱ्यांना दर महिन्याला तब्बल साडे तीन लाख रुपयांचा स्टायपेंड दिला जातो. तसेत फ्रीमध्ये खाणे, आयस्क्रीम, कॉकटेलही मिळते. तसेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गसोबत बसून तुम्हाला चर्चेचीही संधी मिळते.
फेसबुकचे हेडक्वाटर हे जगातील सर्वाधिक सुखवस्तू जागेपैकी एक आहे. इंटर्नशिप झाल्यानंतर येथून सोडून जाण्याचे मनच करत नाही. इंटर्नशिपचा काळ कधी संपला आम्हाला कळलेच नाही, असे फेसबुकच्या हेडक्वार्टरमध्ये इंटर्नशिप केलेल्या एलिझाबेथने सांगितले. तसेच येथील कर्मचाऱ्यांचे वर्तनही इंटर्नशिपसोबत चांगले असते.
तसेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग अन्य कर्मचाऱ्यासारख्या डेस्कवर बसून काम करतो. त्यांचा डेस्कही पूर्णपणे कॉमन आहे. दर गुरुवारी संपूर्ण स्टाफ कॉकटेल एंजॉय करतात. हॅप्पी हवर आणि गेम्सही खेळले जातात, असे आणखी एका इंटर्न्सने यावेळी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.