जयपूरच्या जितेंद्रला Face bookकडून 12 लाखांहून अधिक बक्षिस

सोशल मीडियाच्या जगात सर्वात मोठी वेबसाइट असलेल्या फेसबुकनं जयपूरच्या 22 वर्षीय जितेंद्र जायसवाल या तरुणाला त्याच्या प्रतिभेला सलाम करत 20,000 डॉलर (12 लाखांहून अधिक रुपयांचं) बक्षिस दिलंय. 

Updated: Aug 7, 2014, 05:23 PM IST
जयपूरच्या जितेंद्रला Face bookकडून 12 लाखांहून अधिक बक्षिस title=

जयपूर: सोशल मीडियाच्या जगात सर्वात मोठी वेबसाइट असलेल्या फेसबुकनं जयपूरच्या 22 वर्षीय जितेंद्र जायसवाल या तरुणाला त्याच्या प्रतिभेला सलाम करत 20,000 डॉलर (12 लाखांहून अधिक रुपयांचं) बक्षिस दिलंय. 

 

फेसबुकवरील सिंगल शॉट बग त्यानं शोधून काढला म्हणून हे बक्षित जितेंद्रला देण्यात आलंय. त्याला हा बग फेसबुकच्या पार्स (parse.com) पोर्टलवर आढळला. 

विशेष म्हणजे जगातील सर्व महत्त्वाच्या वेबसाइट बग हंटिंगसाठी हंटर्सना खास बक्षिस देतात. यात फेसबुक, गूगल, मायक्रोसॉफ्ट, पेपल इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. ज्या संख्येनं फेसबुक आणि सोशल साइट्सच्या यूजर्सची संख्या वाढतेय, त्याच पद्धतीनं बग हंटिंगचा ट्रेंड भारतात जोरात वाढतोय. देशभरात 5000हून अधिक तरूण फुल आणि पार्टटाइम बग हंटिंग प्रोफेशनमध्ये आहेत. विशेष म्हणजे यातील अधिक जण कंप्युटर सायंसचे विद्यार्थी आहेत, जे पॉकिट मनीसाठी शिक्षणाबरोबर बग हंटिंगचं काम करतात.
 
3 दिवसाचं काम, कमाई 12 लाखांहून अधिक 

जितेंद्र सांगतो की, 21 जुलै सोमवारी त्यानं फेसबुक एक्झिबिशन वेबसाइट पार्सवर व्हिजिट केलं तर त्याला तिथं बग सापडला. तिथूनच त्यानं पार्सच्या ‘डोक्स’ पेजवर काम सुरू केलं आणि पुढील 48 तासांत त्यानं बग शोधून काढला. मग त्यानं त्यावर रिपोर्ट तयार करून फेसबुकला पाठवली. तिसऱ्या दिवशी म्हणजे 23 जुलैला उशिरा रात्री फेसबुककडून बग एक्सेप्ट केल्याचा मेल आणि आणि 31 जुलैलाल फेसबुककडून 20 हजार अमेरिकी डॉलर पुरस्कार म्हणून दिल्याची माहिती मिळाली. 

देशातल्या तरुणाला आतापर्यंतचा मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार

जितेंद्रच्या मते त्याला मिळालेला बग हंटिंगच्या पुरस्काराची रक्कम ही आतापर्यंत देशातील सर्वात जास्त रक्कम आहे. यापूर्वी तमिळनाडूच्या आरुल कुमारला फेसबुककडून 12,500 डॉलरचा पुरस्कार दिला गेलाय. जितेंद्रला मिळालेल्या पुरस्काराला फेसबुकच्या रिवॉर्ड लिस्टमध्ये टॉप-5मध्ये ठेवलं जाणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.