तब्बल 15 मिनीटं फेसबुक डाऊन, नेटकऱ्यांना त्रास

सर्वात जास्त चालणारी सोशल साइट फेसबुक तब्बल 15 मिनीटं बंद पडली होती. त्यात काही एरर आल्यानं अनेक ठिकाणी फेसबुक सुरू होत नव्हतं.

Updated: Sep 24, 2015, 10:21 PM IST
तब्बल 15 मिनीटं फेसबुक डाऊन, नेटकऱ्यांना त्रास title=

मुंबई: सर्वात जास्त चालणारी सोशल साइट फेसबुक तब्बल 15 मिनीटं बंद पडली होती. त्यात काही एरर आल्यानं अनेक ठिकाणी फेसबुक सुरू होत नव्हतं.

तांत्रिक कारणानं फेसबुक बंद पडलं. 'Sorry, Something Wen Wrong' असा मॅसेज येतोय. त्यामुळं आता फेसबुकची तक्रार करत ट्विटरवर प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीय.

आणखी वाचा - फेसबुकचं पुन्हा `समथिंग वेन्ट राँग`, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस!

रात्री 10च्या सुमारास फेसबुकवर हा एरर आला आणि 15 मिनीटं फेसबुक बंद होतं. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. तब्बल 15 मिनीटं फेसबुक बंद होतं. दरम्यान, मोबाईल फोनवर फेसबुक सुरू आहे. पण कंप्युटरवर बंद होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.