फेसबुककडून हत्यारे विकण्यावर बंदी

बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे.  ऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांना हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, असे कारण सांगत फेसबुकने ही भूमिका घेतली आहे.

Updated: Jan 31, 2016, 11:00 PM IST
फेसबुककडून हत्यारे विकण्यावर बंदी  title=

वॉशिंग्टन : बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे.  ऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांना हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, असे कारण सांगत फेसबुकने ही भूमिका घेतली आहे.

याआधी फेसबुकने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मारिजुआना, बेकायदेशीर ड्रग्ज विकण्यास बंदी घातलीच होती, त्यामध्ये आता हत्यारांची भर पडली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून फेसबुकच्या माध्यमातून खरेदी विक्री करण्याच्या कलामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे फेसबुकच्या प्रॉडक्ट पॉलिसीच्या प्रमुख मोनिका बिकर्ट यांनी सांगितले. 

अर्थात, हत्यारांच्या व्यवहारांवर बंदी घातली असली तरी, नव नवीन उत्पादनं आम्ही आणणार आहोत, कारण मालाच्या विक्रीसाठी चांगली धोरणं आखणं अखेर लोकांसाठीच उपयुक्त असल्याचंही बिकर्ट म्हणाल्या.

अमेरिकेमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांवर गोळ्या घालून त्यांना ठार मारण्याच्या अनेक घटना घडल्यानंतर या विषयावर चर्चा झडत आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोशल नेटवर्किंग साईट्सना आवाहन केलं होतं, की त्यांनी त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या हत्यारांच्या व्यवहारांना आळा घालावा.