न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबूक’नं एक अशा प्रकारचे अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे फेसबूक युजर्सना छुप्या पद्धतीनं आपल्या कमेंट पोस्ट करता येणं शक्य होणार आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, या अॅपमुळे युझर्स आपलं खरं नाव आणि ओळख लपवून उपनावाचा वापर करण्याची परवानगी मिळेल. ज्या गोष्टीवर युजर्स आपल्या खऱ्या नावाने चर्चा करण्यात असहज असतील, अशावेळी ते या पर्यायाचा वापर करू शकतील.
सध्या तरी हे अॅप फेसबूकच्या मुख्य पानावर आणि युजर्सच्या अकाऊंटशी जोडलं जाणार आहे किंवा नाही, याबद्दल मात्र फेसबुककडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
या वर्षाच्या सुरुवातीला फेसबूकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क जुकरबर्ग यांनी अशा प्रकारचं अॅप्लिकेशन लॉन्च करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, नुकतंच ‘फेसबूक’नं ‘स्लिंगशॉट’ नावानं एक अल्पकालीन मॅसेजिंग अॅप्लिकेशन लॉन्च केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.