न्य यॉर्कः अॅपल कंपनीनं १६ ऑक्टोबरला एका इवेन्टसाठी निमंत्रण पाठविले आहे. आयफोन ६ लॉन्च झाल्यानंतर असं सांगितले जातंय की, हा इवेन्ट नवीन आयपॅडसाठी असणार आहे.
हा कार्यक्रम अमेरिकेमधील अॅपल हेडक्वॉर्टर कपर्टिनोमध्ये होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी यावेळी पहिल्यापेक्षा जास्त सडपातळ, जास्त क्षमता असणारा आणि टच आयडी फिगरप्रिंट स्कॅनर असणारा आयपॅड लॉन्च करू शकतं.
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये नवीन आयफोनची विक्री ही एक दिवसा आधीपासूनच होऊ लागली होती. १९ सप्टेंबरला आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस लॉन्च केला होता. संपूर्ण जगात याची सर्वात जास्त मागणी असलेला हा फोन ठरला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.