फेसबूक अकाऊंट आहे तर १० मिनिटात १ लाखाचं लोन

जर तुमचं फेसबूक अकाउंट आहे आणि तुम्हाला लोन आहे तर तुम्हाला बँकेच्या पायऱ्या घासाव्या नाही लागणार. तुम्हाला घरी बसल्या १० मिनिटात एक लाख रुपयांचं लोन मिळेल.

Updated: Aug 4, 2016, 03:28 PM IST
फेसबूक अकाऊंट आहे तर १० मिनिटात १ लाखाचं लोन title=

पुणे : जर तुमचं फेसबूक अकाउंट आहे आणि तुम्हाला लोन आहे तर तुम्हाला बँकेच्या पायऱ्या घासाव्या नाही लागणार. तुम्हाला घरी बसल्या १० मिनिटात एक लाख रुपयांचं लोन मिळेल.

पुण्यातील EarlySalary नावाच्या कंपनीने इंस्टेंट लोन प्रोव्हाईट करण्यासाठी हा नवी योजना आणली आहे. पुण्यात या कंपनीचं हेडऑफिस आहे. कंपनीचा उद्देश एका वर्षात ३०० कोटींचं लोन देणं आहे.

कसं मिळणार लोन 

१. सगळ्यात आधी तुम्हाला EarlySalary हा अॅप डाऊनलोड करावा लागेल.
२. अँड्रॉईड आणि आयओएस यूजर्ससाठी हे अॅप उपलब्ध आहे.
३.विंडोज यूजर या सर्विसचा वापर नाही करु शकत.
४. अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फेसबूक अकाउंटने लॉग इन करावं लागेल.
५. लॉग इन केल्यानंतर तुमची काही माहिती तुम्हाला भरावी लागेल.