मुंबई : जॉब करणाऱ्या प्रत्येक महिला किंवा पुरुषाला सॅलरी अकांऊट बाबत माहित असेलच. जेथे तुम्ही काम करता ती कंपनी तुमचा पगार ज्या अकांउटमध्ये जमा करते त्याला सॅलरी अंकाऊंट म्हणतात. पण तुम्हाला सॅलरी अंकाऊंट बाबतच्या आणखी काही गोष्टी आहेत जे माहित नसतील.
सॅलरी अकाऊंटमध्ये ही कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या हिशोबाने प्रीमियम खातं, , नियमित वेतन खातं आणि डिफेंस वेतन खातं असे वेगवेगळे खाती असतात.
झिरो बॅलेंस खात्याची विशेषता ही आहे की यामध्ये कोणतीही जमा राशी ठेवावी नाही लागत. तर इतर खात्यांमध्ये तुम्हाला एक ठरवून दिलेली रक्कम ठेवावी लागते. या खात्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड, ओवरड्रॉफ्ट आणि इतर काही सेवा दिल्या जातात. तुमच्या या खात्यातील रक्कमेवर कोणतंही व्याज दिलं जात नाही.
जर ३ महिने या अकाऊंटमध्ये पैसे जमा नाही झाल्यास त्याचं रुपांतर बचत खात्यात होतं. बचत खात्यात जर याचं रुपांतर झालं तर एक ठरवून दिलेली रक्कम तुम्हाला या अकांउटमध्ये ठेवावी लागते. पण आता आरबीआयच्या आदेशानुसार जर अकाऊंटमध्ये रक्कम कमी असल्यास त्यावर कोणताही दंड स्विकारला जात नाही.