ईडीने फ्लिपकार्टला बजावली १ हजार कोटींची नोटीस

ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या 'बिग बिलियन सेल'ची अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) चौकशी सुरू केली असून फ्लिपकार्टला एक हजार कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट रिटेल व्यवहार केल्यानं फ्लिपकार्टनं फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

Updated: Oct 14, 2014, 02:39 PM IST
ईडीने फ्लिपकार्टला बजावली १ हजार कोटींची नोटीस title=

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या 'बिग बिलियन सेल'ची अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) चौकशी सुरू केली असून फ्लिपकार्टला एक हजार कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट रिटेल व्यवहार केल्यानं फ्लिपकार्टनं फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

गेल्या आठवड्याच फ्लिपकार्टनं 'बिग बिलियन डे'ची ऑफर दिली होती, ज्यात अनेक प्रॉडक्ट्सवर सूट देण्यात आली होती. याविरोधात किरकोळ व्यापा-यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर ईडीनं ही कारवाई करत फ्लिपकार्टला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

ई-कॉमर्स क्षेत्रात किरकोळ विक्रीवर बंदी असतानाही फ्लिपकार्टनं सेलद्वारे किरकोळ विक्री केल्याचा आरोप ईडीतर्फे निश्चित करण्यात आला आहे. परदेशी सब्सिडीद्वारे फ्लिपकार्टनं भारतात गुंतवणूक केली असून थेट परकीय गुंतवणूकीच्या माध्यमातून (एफडीआय) फ्लिपकार्टनं १८ कोटी डॉलर्स जमा केले आहेत. मात्र, ई-कॉमर्सद्वारे मल्टीब्रांडमध्ये थेट परकीय गुंतवणूक जमा करणं हे फेमा कायद्याचे उल्लंघन मानलं जातं, असं ईडीतर्फे सांगण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.