व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध!

व्हॉट्सअॅपनं व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्यानंतर हॅकर्सनं मोबाईलना टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

Updated: Nov 18, 2016, 04:00 PM IST
व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध! title=

मुंबई : व्हॉट्सअॅपनं व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्यानंतर हॅकर्सनं मोबाईलना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. यासाठी एक बनावट वेबसाईटही सुरु करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप व्हि़डिओ कॉलिंग सुविधा सुरु करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा असा मेसेजे अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर येत आहे.

या वेबसाईटवर क्लिक केल्यावर यूजरला व्हेरिफिकेशनची मागणी केली जाते तसंच हा मेसेज आणखी चार जणांना पाठवण्याचंही सांगितलं जातं. यातूनच मोबाईल हॅक करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तुम्हाला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु करायची असल्यास गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करा आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा वापरायला सुरुवात करा.