कपड्यांवरील डाग काढण्यासाठी घरगुती उपाय

अनेकदा काम करतांना आपल्या शर्टला शाईचे डाग लागतात. त्यामुळे पूर्ण शर्ट खराब होऊन जातो. पण शाईचे डाग काढण्यासाठी तुम्ही हे काही घरगुती उपाय करू शकतात. 

Updated: Feb 3, 2016, 11:25 PM IST
कपड्यांवरील डाग काढण्यासाठी घरगुती उपाय title=

मुंबई : अनेकदा काम करतांना आपल्या शर्टला शाईचे डाग लागतात. त्यामुळे पूर्ण शर्ट खराब होऊन जातो. पण शाईचे डाग काढण्यासाठी तुम्ही हे काही घरगुती उपाय करू शकतात. 

टूथपेस्ट : कपड्यांवर पडलेल्या डागावर टूथपेस्ट लावा आणि ती सुखल्यानंतर कपडे कोणत्याही डिटर्जेंटनी धुवा. डाग निघण्यास मदत होते.

नेल पॉलिश रिमूव्हर : कपड्यांवरील डाग काढण्यासाठी देखील तुम्ही नेल पॉलिश रिमूव्हरचा वापर करू शकता. रिमूव्हर लावून कपडा पाण्याने धुवा.

मीठ : शाई जेव्हा ओली असते तेव्हाच त्यावर मीठ लावून घासलं आणि पाण्याने धुतल्याने डाग निघून जातात. 

दूध : शर्टवर डाग पडल्यास त्याला रात्रभर दुधात भिजत ठेवा. सकाळी डिटर्जेंटने स्वच्छ करून घ्या. डाग निघून जातील.