सायबर वॉर... कळ काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हॅकर्सनं शिकवला धडा!

केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट पाकिस्तानच्या हॅकर्सकडून हॅक झाल्याचं नुकतंच समोर आलं. यानंतर खवळलेल्या भारतीय हॅकर्सच्या एका ग्रुपनंही पाकिस्तानच्या जवळपास २५० हून अधिक वेबसाईटस हॅक केल्यात. यामध्ये, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईट तसंच पाकिस्तानी रेल्वेच्या वेबसाईटचाही समावेश आहे. 

Updated: Sep 30, 2015, 08:36 AM IST
सायबर वॉर... कळ काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हॅकर्सनं शिकवला धडा! title=

नवी दिल्ली : केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट पाकिस्तानच्या हॅकर्सकडून हॅक झाल्याचं नुकतंच समोर आलं. यानंतर खवळलेल्या भारतीय हॅकर्सच्या एका ग्रुपनंही पाकिस्तानच्या जवळपास २५० हून अधिक वेबसाईटस हॅक केल्यात. यामध्ये, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईट तसंच पाकिस्तानी रेल्वेच्या वेबसाईटचाही समावेश आहे. 

शनिवारी फैजल अफजल नावाच्या एका व्यक्तीनं केरळ सरकारची अधिकृत  kerala.gov.in वेबसाईट हॅक केली होती. त्यानंतर काही तासांच्या आतच भारतीय हॅकर्सनं पाकिस्तानच्या २५० हून अधिक वेबसाईट हॅक केल्यात.

पाकिस्तानी वेबसाईटला हॅक करणाऱ्या ग्रुपनं स्वत:ला 'द मल्लू सायबर सोल्जर्स' म्हटलंय. या ग्रुपच्या म्हणण्यानुसार, केरळची वेबसाईट हॅक केल्यामुळे त्यांनी हे प्रत्यूत्तर दिलंय. या ग्रुपनं आपल्या फेसबुक पेजवर पाकिस्तानला भारतीय वेबसाईटसोबत छेडछाड न करण्याची धमकी दिलीय. 

भारतीय वेबसाईटसोबत छेडछाड केली तर पाकिस्तान सरकारच्या ४६ सरकारी आणि ४ शैक्षणिक वेबसाईटला क्रॅश केलं जाईल. 

'फैजल १३३७' या नावानं केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर भारत - पाकिस्तानसोबत डिजिटल वॉर सुरू झाल्याचं दृश्यं सध्या दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.