अमेरिकेत आता फेसबुकवर घटस्फोट

अमेरिकेच्या मॅनहट्टन कोर्टाच्या एका न्यायाधीशाने पतीशी संपर्क करण्यात अयशस्वी ठरलेल्या एका नर्सला आपल्या पतीला फेसबुकद्वारे घटस्फोटाचे कागदपत्र पाठविण्याची मंजुरी दिलीय.

Updated: Apr 8, 2015, 04:17 PM IST
अमेरिकेत आता फेसबुकवर घटस्फोट title=

न्यू यॉर्क: अमेरिकेच्या मॅनहट्टन कोर्टाच्या एका न्यायाधीशाने पतीशी संपर्क करण्यात अयशस्वी ठरलेल्या एका नर्सला आपल्या पतीला फेसबुकद्वारे घटस्फोटाचे कागदपत्र पाठविण्याची मंजुरी दिलीय.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार, मॅनहट्टन सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मॅथ्यू कूपर यांनी नुकताच एका महिलेला फेसबुकद्वारे नवऱ्याला घटस्फोटाची नोटीस पाठविण्याची परवानगी दिली. हा निर्णय इतरांसाठीही लागू असेल की नाही, हे अजून स्पष्ट झालं नाहीय.

एल्लानोरा बेदू (२६) नावाची ही महिला विक्टर सेना ब्लड-जराकू याच्यासोबत २००९मध्ये विवाहबद्ध झाली. नंतर त्यानं घाना परंपरेनुसार विवाह करायला नकार दिला. त्यानं आपल्या पत्नीला तसं वचन दिलं होतं. पण घानी पद्धतीनं त्यानं विवाह केला नाही. म्हणून मग तो तिला न सांगता सोडून गेली. यादरम्यान, फेसबुकवरून तो वेळोवेळी तिच्या संपर्कात होता.

कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये ब्लड जराकू कोणतंही काम करत नाही. त्याच्याजवळ ड्रायव्हिंग लायसंस नाही आणि राहण्यासाठी काही ठिकाण पण नाही.

असं पहिल्यांदा घडलंय की, अमेरिकेत कोणत्या न्यायाधीशानं फेसबुकद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवायला मंजुरी दिलीय. गेल्या वर्षी एका व्यक्तीला सोशल नेटवर्किंग साइटद्वारे चाइल्ड सपोर्ट सिस्टमशी संबंधित कागदपत्र पाठवायला मंजुरी दिली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.