नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या दहावी परीक्षेचा निकाल २० मे रोजी तर १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
दोन्ही परीक्षांचे निकाल http://cbse.examresults.net/या वेबसाइटवर जाहीर करण्यात येतील.
या संदर्भातील खात्रीलायक माहिती www.IndiaEdunews.net वेबसाइटला सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी दिली. या संदर्भात चेन्नई आणि तिरूवनंतपुरम येथील २०१५ चे वार्षिक निकाल सर्वप्रथम जाहीर करण्यात येणार आहे.
या वर्षी २ मार्च रोजी सीबीएसईचे दहावीच्या परीक्षा सुरू होऊन २६ मार्च रोजी प्रक्रिया पूर्ण झाली. या वर्षी सुमारे १३ लाख ७३ हजार ८५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ८.१ लाख विद्यार्थी तर ५.५ लाख विद्यार्थीनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलने याचे प्रमाण ३.३७ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी १३ लाख २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
देशातील १४०४७ सीबीएसई शाळांमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात देशभरात ३५३७ परीक्षा केंद्रे होती.
सीबीएसईच्या बारावीची परीक्षा २ मार्च रोजी सुरू होऊन २९ एप्रिल रोजी संपन्न झाली. या वर्षी १०, ४०, ३६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात ६ लाख विद्यार्थी आणि ४.३ विद्यार्थीनीचा समावेश आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १.०१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल हा खालील वेबसाईटवर पाहा.
http://CBSE.examresults.net/
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.