गाडीचा अपघात झाला तरी मृत्यू होणार नाही, 'व्होल्वो'चा दावा

तुम्ही कारनं प्रवास करताय आणि अचानक तुमच्या कारला अपघात झाला तर... कल्पनाही अंगावर शहारे आणतेय ना... 

Updated: May 15, 2015, 03:02 PM IST
गाडीचा अपघात झाला तरी मृत्यू होणार नाही, 'व्होल्वो'चा दावा title=

नवी दिल्ली : तुम्ही कारनं प्रवास करताय आणि अचानक तुमच्या कारला अपघात झाला तर... कल्पनाही अंगावर शहारे आणतेय ना... पण, याच समस्येवर 'व्होल्वो'नं उपाय शोधून काढलाय. 

स्विडनची कंपनी 'व्होल्वो'नं सुरक्षेच्यादृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत इतरांना मागे टाकलंय. या कार निर्माता कंपनीनं असं तंत्रज्ञान विकसित केलंय ज्यामुळे, गाडीला अपघात झाला तरी चालकाला आणि गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इजा होणार नाही. 

२०२० पासून या गाड्या प्रत्यक्षात रस्त्यावर दिसू लागतील. यानंतर कंपनीची गाडीतून प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला दूर्घटना झाल्यास आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्रीच कंपनीनं दिलीय. 

यासाठी, कंपनीनं शेकडो 'क्रॅश टेस्ट' केल्या आहेत. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, गोटेनबर्ग इथल्या प्लान्टमध्ये लक्झरी कार 'एक्ससी ९०'वर हा प्रयोग करण्यात आलाय. वैज्ञानिकांच्या मदतीने कंपनीनं ३०,००० अशा परिस्थितीच्या थ्रीडी टेस्ट केल्या आहेत. यात अपघात झाल्यावर प्रवाशांना नुकसान होऊ शकणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन कंपनीने आपल्या गाड्यांमध्ये आवश्यक ते बदलही केले आहेत. त्यामुळे, अपघात झाल्यानंतरही प्रवाशांची सुरक्षितता कायम राहील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.