नवी दिल्ली : सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची होणार आहे. यासंबधीचा प्रस्ताव हा नुकताच मंजूर झाला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाचे समर्थन केलं आहे. या बरोबरच तीन भाषा सूत्रांबरोबरच विदेशी भाषा ही चौथी आणि ऐच्छीक असावी याही प्रस्तावावर विचार सुरु आहे.
काही दिवसापूर्वीच तिसरी भाषा म्हणून जर्मन भाषेची निवड करण्यात आली होती. पण हा निर्णय देखिल रद्दबातल झाला होता. आता मात्र या सगळ्यावर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.