'व्हॉटसअप प्लस'च्या युझर्सना केलं बॅन

व्हॉटसअप युजर्झसाठी एक महत्त्वाची बातमी... सध्या व्हॉटसअपकडून अनेक जणांना बॅन केलं गेलंय. तसंच बॅन केल्या गेलेल्या युझर्सना 15 ते 20 तासांनंतर 'व्हॉटसअप प्लस' अपडेट करून वापर करण्यास सांगतिलं जातंय. 

Updated: Jan 21, 2015, 01:42 PM IST
'व्हॉटसअप प्लस'च्या युझर्सना केलं बॅन title=

नवी दिल्ली : व्हॉटसअप युजर्झसाठी एक महत्त्वाची बातमी... सध्या व्हॉटसअपकडून अनेक जणांना बॅन केलं गेलंय. तसंच बॅन केल्या गेलेल्या युझर्सना 15 ते 20 तासांनंतर 'व्हॉटसअप प्लस' अपडेट करून वापर करण्यास सांगतिलं जातंय. 

ही समस्या व्हॉटसअपवर नाही तर नवीन व्हर्जन 'व्हॉटसअप प्लस'वर येतोय. सध्या, वापरात असलेलं 'व्हॉटसअप' मात्र सामान्य रुपात काम करतंय.  

'व्हॉटसअप'च्या मॅसेजमध्ये उल्लेख केल्यानुसार, व्हॉटस्अपच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे काही जणांना बॅन केलं गेलंय. निर्धारित वेळेनंतर, तुम्ही पुन्हा एकदा व्हॉटसअपचा वापर करू शकाल. 

या मॅसेजमध्ये निर्धारीत वेळेची सीमा सांगण्यात आलीय. या वेळेनंतर तुम्ही व्हॉटसअप प्लसचा वापर करू शकाल.

मीडियावर एक टेक न्यूजनुसार, हे अॅप्लिकेशन खोटं असल्याचं सांगण्यात येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.