बजाजची `डिस्कव्हर १०० टी` लॉन्च!

दुचाकी आणि तीन चाकी वाहनं बनविणाऱ्या बजाज ऑटोनं आता बाईकच्या दुनियेत आणखी एक १०० सीसी बाईक दाखल केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 8, 2013, 12:20 PM IST

www.24taas.com, पुणे / नवी दिल्ली
दुचाकी आणि तीन चाकी वाहनं बनविणाऱ्या बजाज ऑटोनं आता बाईकच्या दुनियेत आणखी एक १०० सीसी बाईक दाखल केलीय.
‘डिस्कव्हर १०० टी’ ही बाईक बजाजनं नुकतीच लॉन्च केलीय. नवी दिल्लीतील या बाईकची एक्स-शोरुम किंमत आहे ५०,५०० रुपये. ‘बजाज ऑटो’च्या मोटरसायकल विभागाचे अध्यक्ष के. श्रीनिवास यांच्या म्हणण्यानुसार, ही नवी ‘डिस्कव्हर १०० टी’ १०० सीसी बाईक असली तरी त्याचा आनंद मात्र १२५ सीसी बाईकसारखा मिळणार आहे आणि तेही कमी खर्चात.
या बाईकमध्य ‘फोर-वॉल्व डीटीएस-आय’ ही बजाजची पेटंट करण्यात आलेली तंत्रप्रणाली वापरण्यात आलीय. एका लीटरमध्ये ८७ किलोमीटरचा टप्पा ही बाईक सहज गाठू शकेल, असा दावाही कंपनीकडून करण्यात आलाय. या बाईकमध्ये पाच गिअर आणि सहज सुरू करण्यासाठी ऑटो चॉकची सुविधा देण्यात आलीय.