सुंदर मुलींना सर्वसामान्य दिसणारे मुलं का आवडतात?

ती सुंदर असेल, आणि तो तुलनेने तेवढा हॅण्डसम नसेल तर, लोक सहजच म्हणून जातात, माकडाच्या हाती शॅम्पेन, पण नेमक्या सुंदर मुलींना सर्वसाधारण दिसणारे मुलं कसे भावतात? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

Updated: Sep 2, 2015, 04:49 PM IST
सुंदर मुलींना सर्वसामान्य दिसणारे मुलं का आवडतात? title=

मुंबई : ती सुंदर असेल, आणि तो तुलनेने तेवढा हॅण्डसम नसेल तर, लोक सहजच म्हणून जातात, माकडाच्या हाती शॅम्पेन, पण नेमक्या सुंदर मुलींना सर्वसाधारण दिसणारे मुलं कसे भावतात? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

मुलींना सुंदर मुलं नाही, तर स्मार्ट मुलं आवडतात, आणि स्मार्ट मुलं अधिक हॅण्डसम दिसतात, स्मार्ट हा शब्द इथं स्मार्ट दिसण्यासाठी या अर्थाने नाही, तर तुमच्या बोलण्या, वागण्यात आणि तुमच्या कामात तुम्ही स्मार्ट असले पाहिजेत.

स्मार्ट मुलासोबत डेटिंग करतांना मुली स्वत:ला अधिक सुरक्षित मानतात

स्मार्ट मुलं मुलींना अधिक समजून घेतात, अधिक स्पेस देतात

चारित्र्य, क्षमता आणि निष्ठा या गोष्टी सौदर्यापेक्षाही जास्त महत्वाच्या असतात. 

ही  मुलगी आपल्यापेक्षा सुंदर आहे, याची सर्वसामान्य दिसणाऱ्या मुलाला जाण असते, आणि त्या काळजीतून त्या मुलीला तो अधिक प्रेम करतो.

आपला पार्टनर श्रेष्ठ म्हणजे सर्वगुण संपन्न आहे, ते त्यांना सौंदर्यापेक्षाही अधिक असते.

सर्वसाधारण दिसणारा पार्टनर आपल्याला सोडून दुसरी वाट धरणार नाही, ही सुरक्षितता त्यामागे जरूर असते.

आपले नाते शेवटपर्यंत टिकावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.