तुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे!

तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील. 

Updated: Mar 22, 2016, 01:24 PM IST
तुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे! title=

नवी दिल्ली : तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील. 

अॅप्पल आयफोन यूझर्ससाठी ही एक खुशखबरच आहे. आत्तापर्यंत कंनी केवळ ज्या आयफोनची स्क्रीन आणि बटन चांगले असतील असेच स्मार्टफोन स्वीकारत होती... पण, आता मात्र कंपनी तुटलेले - फुटलेले - खराब झालेले आयफोनही तुमच्याकडून खरेदी करणार आहे.

फोन अपग्रेडवर मिळणार सुविधा

तुटलेले, खराब झालेले स्मार्टफोन वापरणाऱ्या आपल्या युझर्सला अपग्रेड करण्याचा मानस असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. 

आयफोन ५ साठी सुविधा

परंतु, कंपनीची ही स्कीम केवळ आयफोन ५ साठी आहे. तुटलेल्या स्क्रीनसहीत हा स्मार्टफोन कंपनी परत घेणार आहे. यामुळे, जास्तीत जास्त लोक नवीन फोन खरेदी करण्यास उत्सुक असतील, असं कंपनीला वाटतंय. 

अमेरिकेत चांगल्या स्क्रीन आणि बटनसहीत फोनच्या ऐवजी ३५० डॉलर म्हणजेच जवळपास २३,४०० रुपये ग्राहकांना परत देत आहे. तर तुटलेल्या 

- आयफोन ५ साठी ५० डॉलर

- आयफोन ६ साठी २०० डॉलर आणि  

- आयफोन ६ प्लससाठी २५० डॉलरचं क्रेडिट देणार आहे.