न्यूयॉर्क : 'आयफोन- 6'च्या लॉचिंगच्या पार्श्वभूमीवर 'वॉलमार्ट'ने आयफोन-5S ची किंमत कमी केली आहे. 40 हजार रुपयांचा आयफोन-5C हा चक्क साडे चार हजार रुपयांत मिळत आहे. मात्र, हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेत जावे लागणार आहे.
अॅपलचा बहुप्रतीक्षित 'आयफोन-6' येत्या सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच या फोनविषयी अनेक वावड्या उठवल्या जात आहेत.
'आयफोन- 5C' हा फक्त 97 सेन्ट्स अर्थात 58 रूपयांत मिळत आहे. ही थक्क करणारी बाब असली तरी, याबाबत अद्याप अॅपलच्या अधिकार्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारतात आयफोन- 5S ची किमत 40 हजार आहे. मात्र, अमेरिकेतील वॉलमार्टमध्ये हा फोन 79 डॉलर अर्थात साडे चार हजाराला विकला जात आहे.
दरम्यान, ऍपलची 'आयफोन-6' हा लेटेस्ट फीचर्सने अद्ययावत असून 4.7 आणि 5.5 इंच स्क्रीनमध्ये उपलब्ध होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.