अॅपलचा आयपॅड एअर 2, आयपॅड मिनी-3 लॉन्च

 अॅपलने आयपॅड एअर-2 आणि आयपॅड मिनी-3 हे दोन गॅझेट लाँच केले आहेत. अॅपलने आपला आयपॅड भारतात लाँच केला आहे.  आठवड्यापूर्वीच अॅप्पलने या दोन्ही टॅबलेटची ई-कॉमर्सच्या साईटवर पूर्व नोंदणी सुरू केली होती. जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपलने आपल्या दोन्ही टॅबलेट जगासमोर आणले होते.

Updated: Nov 30, 2014, 10:42 PM IST
अॅपलचा आयपॅड एअर 2, आयपॅड मिनी-3 लॉन्च title=

मुंबई:  अॅपलने आयपॅड एअर-2 आणि आयपॅड मिनी-3 हे दोन गॅझेट लाँच केले आहेत. अॅपलने आपला आयपॅड भारतात लाँच केला आहे.  आठवड्यापूर्वीच अॅप्पलने या दोन्ही टॅबलेटची ई-कॉमर्सच्या साईटवर पूर्व नोंदणी सुरू केली होती. जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपलने आपल्या दोन्ही टॅबलेट जगासमोर आणले होते.

आयपॅड एअर- 2 हा आत्तापर्यंतचा सर्वात कमी जाडीचा टॅब आहे. याची जाडी 6.1 मिलीमीटर इतकी असून त्याची स्क्रीन 9.7 इंच इतकी आहे. या टॅबचा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असून तो आयसाईट कॅमेरा आहे. यामध्ये लाईव्ह एचडीआर पॅरेनोमा सारखे अॅपलचे पेटंट असलेले अनेक फिचर्स आहेत.

आयपॅड मिनी-3 हा जनरेशनल अपग्रेड आयपॅड आहे, ज्यात रेटिना डिस्प्ले, टचआयडी आणि अनेक शानदार फिचर्स आहेत.अॅपल भारतात हा टॅब दिवाळीत लाँच करणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र तसं झालं नाही. मात्र आता कंपनीने तो लाँच केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.