'अॅपल'चा भारतीय ग्राहकांना जबरदस्त धक्का...

तुम्हाला अॅप्पल फोन विकत घ्यायची असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात अॅपलनं आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केलीय. 

Updated: Mar 5, 2015, 08:54 PM IST
'अॅपल'चा भारतीय ग्राहकांना जबरदस्त धक्का...  title=

नवी दिल्ली : तुम्हाला अॅप्पल फोन विकत घ्यायची असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात अॅपलनं आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केलीय. 

आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस या मॉडेल्सच्या किंमतींमध्ये अडीच हजार रुपयांनी वाढ होईल. म्हणजेच, आयफोन 6 आता तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर 56 हजार रुपये मोजावे लागणार आहे. हाच फोन आत्तापर्यंत 53,500 रुपयांना मिळत होता. ही किंमत 16 जीबीच्या 'आयफोन 6'साठी आहे. 

'आयफोन 6'चे 64 जीबी आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत आता क्रमश: 65,000 आणि 74,000 रुपये असेल. 

तर, 16 जीबीच्या 'आयफोन 6 प्लस'च्या फोनची किंमत 65 हजार रुपये असेल तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 74 हजार रुपये आणि 128 जीबीसाठी 83,000  रुपये मोजावे लागतील.

जुन्या आयफोन मॉडल्सवरही या वाढलेल्या किंमतींचा प्रभाव दिसून येणार आहे. 8 जीबीच्या 'आयफोन 5सी'ची किंमत 33,500 रुपये असेल. आयफोन 5चं 16 जीबीचं मॉडेल 47 हजार रुपयांना उपलब्ध होईल तर 32 जीबीच्या आयफोनचं मॉडेल 51,500 रुपयांना मिळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.