मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियानंही नवे डेटा प्लॅन सुरु केले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या या प्लॅनवर एक नजर टाकूयात.
रिलायन्स जिओच्या 303 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 1GB 4G डेटा मिळणार आहे. म्हणजेच 28 दिवसांसाठी जिओच्या ग्राहकांना 28GB डेटा मिळेल. रिलायन्सचा हा प्लॅन प्राईम मेंबरशीप असणाऱ्यांनाच मिळणार आहे. 31 मार्च 2017पर्यंत 99 रुपये भरून रिलायन्स जिओचं प्राईम मेंबर होता येणार आहे.
प्राईम मेंबरशीप नसलेल्या ग्राहकांना दिवसाला 2.5GB डेटा मिळणार आहे. ग्राहकांनी दिवसाला मिळणारा डेटा वापरला नाही तर उरलेला डेटा पुढच्या दिवशी वापरता येणार नाही.
- ३४२ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना महिन्याला २८ GB इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला एक GB इंटरनेट डेटा वापरता येईल.
- ३४६ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना महिन्याला १० GBचा इंटरनेट डेटा २८ दिवसांसाठी मिळेल. याबरोबरच प्रत्येक दिवसाला ३०० मिनिटांचा व्हॉईस कॉल फ्री मिळणार आहे.
- या दोन्ही ऑफर १५ मार्चपर्यंत व्हॅलीड असणार आहेत.
- १५ मार्चपूर्वी या प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्यांना आणखी २८ दिवसांची सुविधा फ्री मिळणार आहे.
- व्होडाफोनची ही स्कीम फक्त प्रिपेड ग्राहकांनाच मिळणार आहे.
- ही स्कीम घेणाऱ्या ग्राहकांना पुढच्या ११ महिन्यांसाठी हाच प्लॅन लागू ठेवता येईल.
एअरटेलच्या 345 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये 28GB डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे. म्हणजेच दिवसाला 1GB डेटा मिळणार असला तरी ग्राहकांना सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत 500MB आणि रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत 500MB डेटा वापरता येईल.
31 मार्चपर्यंत 345 रुपयांचं रिचार्ज केल्यावर एअरटेलच्या ग्राहकांना पुढच्या 12 महिन्यांसाठी ही स्कीम वापरता येईल. एअरटेलच्या या ऑफरमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचाही समावेश आहे.
348 रुपयांमध्ये आयडियाच्या ग्राहकांना दिवसाला 500MB म्हणजेच महिन्याला 14GB डेटा मिळणार आहे. पण व्होडाफोन आणि एअरटेलप्रमाणे सगळ्याच आयडिया ग्राहकांना या स्कीमचा लाभ घेता येणार नाही. आयडीयानं निश्चित केलेल्या ग्राहकांनाच या ऑफरचा लाभ घेता येईल. या ऑफरसाठी आयडिया त्यांच्या ग्राहकांना फोनकरून या स्कीमविषयी माहिती देणार आहे.