'जिओ'च्या महत्त्वकांक्षी घोडदौडीला 'एअरटेल'नं मारला ब्रेक

रिलायन्स 'जिओ' लवकरच ब्रॉडबॅन्ड आणि सेट टॉप बॉक्स ग्राहकांसमोर आणणार असल्याची चर्चा सुरू असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी 'एअरटेल'नं अॅन्ड्रॉईड इंटरनेट टिव्ही लॉन्च केलाय. 

Updated: Apr 12, 2017, 06:03 PM IST
'जिओ'च्या महत्त्वकांक्षी घोडदौडीला 'एअरटेल'नं मारला ब्रेक title=

मुंबई : रिलायन्स 'जिओ' लवकरच ब्रॉडबॅन्ड आणि सेट टॉप बॉक्स ग्राहकांसमोर आणणार असल्याची चर्चा सुरू असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी 'एअरटेल'नं अॅन्ड्रॉईड इंटरनेट टिव्ही लॉन्च केलाय. 

हा भारताचा पहिला इंटरनेट टीव्ही आहे जो अॅन्ड्रॉईड टीव्ही लेस हायब्रिड डीटीएच सेट टॉप बॉक्सवर चालेल, असा दावा एअरटेलनं केलाय. म्हणजेच, कोणत्याही साध्या टीव्हीला हा सेट टॉप बॉक्स 'स्मार्ट टीव्ही'मध्ये बदलून टाकू शकतो. १२ एप्रिलपासून शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवर हा इंटरनेट टीव्ही खरेदी करता येईल.  


इंटरनेट टीव्ही लॉन्च 

इंटरनेट टीव्हीची वैशिष्ट्ये...

- या टीव्हीमध्ये गेम्स आणि अॅप्सही डाऊनलोड केले जाऊ शकतील.

- सॅटेलाईटनं चालवल्या जाणाऱ्या ५०० टीव्ही चॅनल्ससोबतच नेटफ्लिक्स, युट्युब, गूगल प्ले गेम्स, एअरटेल मुव्हिज यांसहीत अनेक फिचर्स अगोदरपासूनच लोड असतील.

- शिवाय यामध्ये तुम्ही गुगल प्ले स्टोअरच्या साहाय्यानं तुमचा आवडता प्रोग्राम किंवा गेम्सचा आनंद घेऊ शकाल.

- या स्मार्ट टीव्हीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन कंटेंट तुम्ही सहजगत्या स्विच करू शकाल.

- व्हॉईस आधारित सर्च फिचर असणारा खास रिमोटही यासोबत असेल... म्हणजे, तुम्ही ज्या चॅनलचं नाव घ्याल ते चॅनल तुमच्या स्क्रिनवर हजर असेल.

- मोबाईल फोन कंटेंटचा आनंद तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर घेता येईल.

काय असेल किंमत...

'इंटरनेट टीव्ही'च्या वापरासाठी ग्राहकांना ४९९९ रुपये तीन महिन्यांसाठी भरावं लागेल. तर वर्षभराचं सबस्क्रिप्शन एकदाच घेतलं तर केवळ ७९९९ रुपये भरावे लागतील. यामध्येच सेट टॉप बॉक्सची किंमतही सामील आहे. शिवाय सद्य प्लानमध्ये २५ जीबी एक्स्ट्रा डाटाही मिळेल.