तब्बल 17 वर्षांनंतर गुगलनं बदलला आपला लोगो

जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून वापरल्या जाणाऱ्या गुगलनं आपला लोगो बदललाय. आज अॅनिमेटेल आणि नव्या लूकमध्ये गुगलनं लोगो लॉन्च केलाय गुगल-डुडलच्या रुपात.

Updated: Sep 2, 2015, 09:59 AM IST
तब्बल 17 वर्षांनंतर गुगलनं बदलला आपला लोगो title=

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून वापरल्या जाणाऱ्या गुगलनं आपला लोगो बदललाय. आज अॅनिमेटेल आणि नव्या लूकमध्ये गुगलनं लोगो लॉन्च केलाय गुगल-डुडलच्या रुपात.

आणखी वाचा - गुगल मॅप्स आता ‘थ्रीडी’मध्ये...

तब्बल 17 वर्षांनंतर कंपनीनं आपला लोगो बदललाय. कंपनीनं आपल्या ब्लॉगवर आणि ट्विटरवरून ही माहिती दिलीय.

वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर लोकं गुगलचा वापर करत असतात. गुगल आता मोबाईल फोन, टिव्ही, घड्याळ, तुमच्या कारचं डॅशबोर्ड आणि डेक्सटॉपवरही वापरला जातो. 

नव्या लोगोमध्ये गुगलनं लहान 'g' निळ्या रंगाचा केलाय. तर 'G'चार रंगांनी मिक्स्ड केलाय. गुगलनं पहिल्यांदा काही बदल केलाय असं नाही, यापूर्वी गुगलनं सर्च, मॅप्स, जीमेल, क्रोम आणि इतर विभागांमध्ये बदल केलेले आहेत. 

आणखी वाचा - आता गुगलवरूनही करता येणार ऑनलाईन शॉपिंग

आता गुगल मोबाईल सर्चचा लोगो सुद्धा बदलणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.