धक्कादायक! ७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये पोर्नचं आकर्षण

सध्याची कुटुंबव्यवस्था एकटी पडत चालली आहे. आई-वडिल दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असता त्यामुळे बराच मुलं घरात एकटे असतात. आज तर अनेक शाळकरी मुलं अगदी लहानपणापासूनच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचा आजच्या मुलांवर अधिक प्रमाण वाढतोय. आठवी ते दहावीमधली मुलं आज मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफीकडे वळत आहेत.

Updated: Aug 29, 2016, 04:40 PM IST
धक्कादायक! ७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये पोर्नचं आकर्षण title=

मुंबई : सध्याची कुटुंबव्यवस्था एकटी पडत चालली आहे. आई-वडिल दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असता त्यामुळे बराच मुलं घरात एकटे असतात. आज तर अनेक शाळकरी मुलं अगदी लहानपणापासूनच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचा आजच्या मुलांवर अधिक प्रमाण वाढतोय. आठवी ते दहावीमधली मुलं आज मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफीकडे वळत आहेत.

अश्लील व्हिडिओचा समाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. यामुळे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं देखील काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. आज आठवीनंतरच्या मुलांमध्ये पोर्नविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण दिसत आहे. जवळपास ७० टक्के मुलं हे पोर्नकडे ओढले जात आहे.

एकटेपण हे याला कारणीभूत असणारी एक मोठी समस्या आहे. मुले आपल्या आई-वडिलांपासून लांब होत चालली आहेत. एखाद्या गोष्टीची जर स्पष्टता नसेल तर मुलं त्याकडे चुकीच्या पद्धतीकडे वळतात.