मुंबई : भारतात ‘श्याओमी’ कंपनीच्या स्मार्टफोनची जादू कायम आहे. भारतात कंपनीचा पहिला स्मार्टफोन ‘एमआय 3’चा स्टॉक अनेक वेळा सेकंदांत विकलेला पाहायला मिळालाय. आता, श्याओमीच्या ‘रेडमी 1 एस’चा चौथा स्टॉक अवघ्या 5.2 सेकंदांत विकला गेलाय.
श्याओमीचा हा तब्बल 60,000 स्मार्टफोन्सचा स्टॉक होता. कंपनीनं ट्विट करून आपल्या या कामगिरीची माहिती दिलीय. ‘श्याओमी रेड 1 एस’ खरेदी करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता या फोनच्या पुढच्या स्टॉकची विक्री 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. ज्यासाठी आज सायंकाळी 6 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं. ज्या लोकांनी यासाठी अगोदरच रजिस्ट्रेशनक केलंय पण, ते फोन विकत घेऊ शकले नाहीत, त्यांना मात्र पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.
कसे विकले गेले 5.2 सेकंदांत 60,000 मोबाईल्स...
दुसऱ्यांदा ‘एमआय 3’चा स्टॉक अवघ्या 5 सेकंदांत संपल्यानंतर लोकांनी या विक्रीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेव्हा कंपनीनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. टाईम सुरु होताच ग्राहक आपल्या शॉपिंग कार्टमध्ये स्मार्टफोन अॅड करू शकतात.
त्यांनी हा फोन अॅड केल्या केल्या तो स्टॉकमधून वजा केला जातो. त्यामुळेच, स्मार्टफोन इतक्या लवकर ‘आऊट ऑफ स्टॉक’ होताना दिसतात. त्यानंतर, या फोनचं पेमेंट आणि चेक आऊटपेजवर जाऊन इतर कामं ग्राहक आरामात पूर्ण करू शकतात.
श्याओमी ‘रेडमी 1 एस’ची वैशिष्ट्यं...
* ड्युएल सिम सपोर्ट
* डिस्प्ले : 4.7 इंचाचा एचडी डिस्प्ले, ड्रॅगनट्रेल ग्लाससहीत
* रिझॉल्युशन : 720 X 1280 पिक्सल
* प्रोसेसर : 1.6 गीगाहर्टझ क्वॉड कोअर क्वॉलकॉम प्रोसेसर
* रॅम : 1 जीबी
* जीपीयू : एड्रिनो 305
* कॅमेरा : 8 मेगापिक्सल कॅमेरा (बीएसआय सेन्सरसहीत), 1920 X 1080 व्हिडिओ शूट शक्य
* फ्रंट कॅमेरा : 1.6 मेगापिक्सल
* स्टोअरेज : 8 जीबी इंटरनल स्टोअरेज, मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 64 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं.
* बॅटरी : 2000 मेगाहर्टझ
* कनेक्टिव्हिटी : जीपीआरएस, एज, 3G, जीपीएस, वाय-फाय और ब्लू टूथ 4.0
* लांबी, रुंदी आणि जाडी : 137 x 69 x 9.9 मिलीमीटर
* रंग : ग्रे कलर (करडा)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.