आयफोन-5S झाला स्वस्त, किमतीत घट

अॅपलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अॅपलनं नुकतीच आयफोनची नवीन सीरिज लॉन्च केलीय हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता अॅपलनं मागील मॉडेल आयफोन- ५एसच्या किमतीत खूप घट झालीय. 

Updated: Sep 23, 2014, 02:29 PM IST
आयफोन-5S झाला स्वस्त, किमतीत घट    title=

मुंबई: अॅपलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अॅपलनं नुकतीच आयफोनची नवीन सीरिज लॉन्च केलीय हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता अॅपलनं मागील मॉडेल आयफोन- ५एसच्या किमतीत खूप घट झालीय. 

इ-कॉमर्स साइटवर आता हा फोन आपल्याला अवघ्या ३५,००० रुपयांपर्यंत कमी झालीय. किमती कमी करण्याच्या मागे आयफोनची नवी सीरिज लॉन्चिंगचं कारण सांगण्यात येतंय. 

फ्लिपकार्ट आणि अॅमॅझॉनवर आयफोन-५एस गोल्डच्या १६जीबी फोनची किंमत ३४,८५० रुपये झालीय. तर ब्लॅक आणि सिल्व्हर कलरमध्ये असलेल्या फोनची किंमत जवळपास ३७,००० रुपये आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन गोल्डची डिमांड सर्वात जास्त होती आणि विक्री सुरू होताच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. 

लॉन्चिंगच्या वेळी आयफोन ५एस या १६ जीबी फोनची किंमत ५३,५०० रुपये होती. तर ३२ आणि ६४ जीबी फोनची किंमत क्रमश: ६२,५०० आणि ७१,५०० रुपये होती.  

आयफोनच्या चाहत्यांनी आणखी थोडी वाट पाहिल्यास भविष्यात आणखीही आयफोन -५एसच्या किमची कमी होऊ शकतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.