नवी दिल्ली : सहा वर्षांचा कौटिल्य हा स्वत:ची प्रशिक्षण संस्था काढणार आहे. एवढेच नव्हे तर तो शिक्षकाच्या भूमिकेत असेल. कौटिल्यची बुद्धमता अफाट असल्याने त्याला गूगल बॉय म्हणून ओळखले जाते. झी मीडियाने सर्वप्रथम कौटिल्यची बुद्धमता जगासमोर पुढे आणली.
कौटिल्यचे वडील सतीश शर्मा यांनी मुलांसाठी प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला. कौटिल्यची प्रशिक्षण संस्था ही यावर्षीपासून जुलै महिन्यापासून सुरु होणार आहे. जुलैपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जाणार आहे. प्रवेश चाचणी एक आठवडा होईल. यामध्ये चर्चा, वादविवाद, सुंदर हस्ताक्षर, वैचारिक, खगोल विज्ञान, उपग्रह विषय ज्ञान, भूगोल, चित्रकला, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरणसह अन्य विषयांप्रती माहिती याची चाचणी घेतली जाणार आहे.
कौटिल्य हा हरियाणामधील कर्नाल जिल्ह्यातील कोहंदा गावचा रहिवासी आहे. त्याचे भूगोल आणि खगोल विषय ज्ञान अफाट आहे. त्यावरून त्याला हे नाव देण्यात आले आहे. भुवनेश्वरमधील जगन्नाथ मंदिर येथे त्यांने शिक्षणाचे धडे घेतलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.