टचस्क्रीन स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ४ महत्त्वाच्या गोष्टी

टचस्क्रीन स्मार्टफोन आज अनेकांच्या पसंतीचा विषय बनला आहे. टचस्क्रीन फोन ग्लोबल विश्वाकडे घेवून जात असला तरी त्याचे काही नुकसान देखील आहे.

Updated: Jul 12, 2016, 12:35 PM IST
टचस्क्रीन स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ४ महत्त्वाच्या गोष्टी title=

मुंबई : टचस्क्रीन स्मार्टफोन आज अनेकांच्या पसंतीचा विषय बनला आहे. टचस्क्रीन फोन ग्लोबल विश्वाकडे घेवून जात असला तरी त्याचे काही नुकसान देखील आहे.

१. इज्रायलच्या रेमडेम मेडिकल सेंटरच्या वैज्ञानिक याबाबतीत चिंता करत आहेत की टचस्क्रीन स्मार्टफोन मनुष्याच्या शारिरावर आणि मानसिकतेवर कसा परिणाम करत आहे. आज प्रत्येक वयातील व्यक्ती टचस्क्रीन फोन आणि डिवाइसपासून वेगळं होण्याची कल्पानाही नाही करु शकत.

२. तरुणांवर हे मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवत आहे. प्रोफेसर नेम शेदेह म्हणतात की, मोबाइलमुळे शारीरिक हालचाली कमी होत जातात. या फोनसाठी फक्त हात आणि बोटं काम करतात. इतर शरीराचा काहीच उपयोग होत नाही.

३. रस्त्यातही तरुण वर्ग मोबाईलवर काहीतरी टाईप करतांना किंवा वापरतांना दिसतात. असं करुन तरुण वर्ग आपला जीव धोक्यात घालतात. तरुणांचं वजन हे त्याच्या वयाच्या अधिक होण्याचं हे मुख्य कारण आहे.

४. अमेसक म्हणतात की, लहान मुलांचा मेंदु नाजूक असतो. फोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिएशनमुळे याचा त्यांच्या मेंदुवर परिणाम होतो. टचस्क्रीन मोबाईलची वाढती लोकप्रियता ही समाज आणि लोकं एकमेकांपासून दूर होण्याचं एक कारण आहे. यामुळे माणूस असमाधानी होत चालला आहे.